महापालिका शिक्षण समिती सभापती, उपसभापतिपदासाठी शुक्रवारी निवडणूक; ऑफलाइन होणार निवडणूक  

नाशिक : कोरोना प्रादुर्भावामुळे महासभेसह विषय समित्यांच्या निवडणुका ऑनलाइन घेण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले असले तरी शिक्षण समिती सभापती, उपसभापतिपदासाठीची निवडणूक ऑफलाइन होणार आहे. सकाळी अकराला जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होईल. असे सांगण्यात आले आहे.

महापालिका शिक्षण समिती सभापती, उपसभापतिपदासाठी निवडणूक 

महापालिका शिक्षण समिती सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या संगीता गायकवाड, उपसभापतिपदासाठी शाहीन मिर्झा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर शिवसेनेकडून ज्योती खोले यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक अटळ असली तरी भाजपकडे बहुमत असल्याने गायकवाड व मिर्झा यांची अनुक्रमे सभापती व उपसभापतिपदावर निवड होणार आहे. 

भाजपकडून संगीता गायकवाड, शाहीन मिर्झा, शिवसेनेकडून ज्योती खोलेंचा अर्ज 
शिक्षण समिती सभापती, उपसभापतिपदासाठी येत्या शुक्रवारी (ता. ५) निवडणूक होत आहे. समितीवर भाजपच्या विद्यमान सभापती संगीता गायकवाड व उपसभापती शाहीन मिर्झा यांच्यासह शिवाजी गांगुर्डे, सरिता सोनवणे, हेमलता कांडेकर, तर शिवसेनेच्या ज्योती खोले, सुनील गोडसे, किरण गामणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र महाले यांची नियुक्ती झाली आहे. आता सभापतिपदाची निवडणूक ५ मार्चला होणार असल्याने त्यासाठी बुधवारी (ता. ३) अर्ज स्वीकारले. सभापतिपदासाठी भाजपच्या संगीता गायकवाड व उपसभापतिपदासाठी शाहीन मिर्झा यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दोघांनीही प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले. शिवसेनेच्या ज्योती खोले यांनीदेखील अर्ज दाखल करून आव्हान निर्माण केले आहे. परंतु बहुमत असल्याने भाजपचे समितीवरचे वर्चस्व कायम राहणार आहे. गेल्या वर्षी गायकवाड व मिर्झा सभापती व उपसभापती होत्या. परंतु कोरोनामुळे शाळा बंद असल्याने काम करण्याची संधी न मिळाल्याचा दावा केल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. 

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

ऑफलाइन होणार निवडणूक 
कोरोना प्रादुर्भावामुळे महासभेसह विषय समित्यांच्या निवडणुका ऑनलाइन घेण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले असले तरी शिक्षण समिती सभापती, उपसभापतिपदासाठीची निवडणूक ऑफलाइन होणार आहे. सकाळी अकराला जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होईल. 

 हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा

प्रत्येकी दोन अर्ज 
शहर सुधार व आरोग्य समितीच्या निवडणुकीत सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत स्वाक्षरीमुळे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आल्याने भाजपची नाचक्की झाली होती. त्यामुळे शिक्षण समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत बहुमत असूनही प्रत्येकी दोन-दोन अर्ज दाखल करण्यात आले.