महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे विनामंजुरी ८.८४ कोटींची खरेदी; नगरसेवकांचा आरोप

नाशिक : महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे शहरातील उद्यानांत विविध प्रकारचे साहित्य पुरविताना ६६ लाखांची निविदा मंजूर असताना ८.८४ कोटींची विनानिविदा खरेदी करण्यात आल्याचा आरोप नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी केला. 

दोन लाखांपेक्षा अधिक खर्चासाठी निविदा काढणे बंधनकारक आहे. परंतु उद्यान विभागाने शहरातील उद्यानांमध्ये खेळणी, बेंचेस टाकण्यासाठी विनानिविदा खरेदी केल्याचा दावा बडगुजर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. २१७ कामांच्या नस्ती आयुक्तांच्या अधिकारात करण्यात आली आहे. सप्टेंबरच्या स्थायी समितीच्या सभेत कामांची माहिती सादर करण्यात आली होती. किती रकमेची निविदा मंजूर आहे. प्रशासकीय मान्यता कधी घेण्यात आली, स्थायी समितीने किती रुपयांची वित्तीय मान्यता दिली, निविदेचा वार्षिक दर ठरविण्यात आला होता. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

२०१८-१९ व २०१९-२० या आर्थिक वर्षामधील मंजूर दराने किती कामे मंजूर झाली. मक्तेदारांना किती रकमेची देयके अदा करण्यात आली, यासंदर्भातील माहिती उद्यान विभागाने फक्त १३ ऑगस्ट २०१९ ते २६ मार्च २०२० पर्यंत दिली. या कालावधीत २१७ कामांच्या नस्ती मागील निविदा मंजूर दराने केल्या. त्यात ८.८४ कोटी रुपयांच्या कामांचे तुकडे पाडण्यात आल्याचा आरोप श्री. बडगुजर यांनी केला. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

६६ लाख रुपयांच्या निविदा मंजूर असताना मागील निविदा मंजूर दराने उद्यान विभागाने ८.८४ कोटींच्या उद्यानाचे साहित्य खरेदी केले. या प्रकरणाची चौकशी व्हावी. - सुधाकर बडगुजर, नगरसेवक