महापालिकेच्या वैद्यकीय पदभरतीत नियमांचा फज्जा; नोकरीसाठी शेकडो उमेदवार दाखल 

नाशिक : कोरोना संसर्ग वाढत असल्याने महापालिकेतर्फे वैद्यकीय विभागासाठी मानधनावर मोठी भरती सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. २३) मुलाखतीच्या दिवशी शेकडो उमेदवार दाखल झाले; परंतु ज्या पालिका प्रशासनाकडून सामाजिक अंतर नियमाचे धडे दिले जात आहेत, त्याच मुख्यालयात मात्र उमेदवार भरती करताना फज्जा उडाल्याचे दिसून आले. 

फेब्रुवारीत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने पालिकेने वैद्यकीय विभागासाठी २१० पदांवर जम्बो भरती काढली. त्यात वैद्यकीय अधिकारी ५५, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३०, स्टाफ नर्स ५०, एएनएम ६०, डाटा एन्ट्री ऑपरेटर आठ, एमएस्सी मायक्रबॉयलॉजी चार, एमडी मायक्रॉबायलॉजी दोन या पदांचा समावेश आहे. मंगळवारी पदांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी तीनच्या सुमारास सुरू झालेल्या मुलाखतीदरम्यान उमेदवारांनी मोठी गर्दी केली. पालिका मुख्यालयात शेकडो उमेदवार भरतीसाठी आल्याने नियमांचा फज्जा उडाला. पालिका आवारापासून ते अतिरिक्त आयुक्त कार्यालयापर्यंत उमेदवारांनी गर्दी केली. सायंकाळी सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्यानंतर भरतीसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये अंतर ठेवण्यात आले. 

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

उशिरापर्यंत मुलाखती 

उमेदवारांनी या भरतीसाठी तोबा गर्दी केली होती. डाटा एन्ट्रीची आठ पदे असताना मुलाखतीसाठी तब्बल दोनशेच्या आसपास उमेदवार पालिकेत आले होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत या मुलाखती सुरू होत्या. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ