नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिरातील कार्यक्रमासाठी महापालिकेने ५० टक्के सूट दिली असली तरी रंगकर्मींना ती मान्य नाही. भाड्यात ७५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळेपर्यंत नाट्यप्रयोग सुरू न करण्याची भूमिका रंगकर्मींनी घेतल्याने नाट्यप्रयोग लांबण्याची शक्यता आहे.
कालिदासचे ७५ टक्के भाडे सवलत द्या
कोरोनानंतर बदललेल्या परिस्थितीत मुंबई, पुण्याच्या धर्तीवर २५ टक्के भाड्यासोबत इतर सवलती मिळाव्यात, अशी रंगकर्मींची मागणी आहे. राज्यात शासनाच्या सर्व नाट्यगृहांत भाड्यात ७५ टक्के सवलत मिळत आहे. नाट्यव्यवसाय पूर्ववत सुरू होण्यासाठी भाडे सवलतीव्यतिरिक्त प्रयोगापोटी भरावी लागणारी अनामत रक्कम, अतिरिक्त चार्जेस, फक्त तीन तासांचे एक सत्र आणि सत्राची चुकीची वेळ असे सर्व विषय मार्गी लागल्यानंतरच सजीव आणि दर्जेदार मनोरंजनाचा पुनश्च हरिओम होईल, असे रवींद्र कदम, जयप्रकाश जातेगावकर, राजेंद्र जाधव, सुनील ढगे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा>> पुन्हा पबजी गेमने घेतला जीव? घरात गळफास घेत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या
हेही वाचा>> मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण