महापालिकेला निधी देताना राज्य सरकारकडून भेदभाव – गिरीष महाजन

नाशिक : राज्यात सत्तांतर झाल्याने महापालिकेला निधी देताना भेदभाव केला जात आहे. फडणवीस सरकार असते तर शहराचा विकास दुप्पट गतीने झाला असता, राज्यात जेथे भाजपची सत्ता आहे तेथे सरकार दुजाभाव करतं आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात आठ ते दहा जिल्ह्यांना भरघोस निधी मिळाला. परंतु अनेक जिल्हे असे आहेत कि तेथे अपुरा निधी दिल्याचा आरोप माजी मंत्री गिरीष महाजन यांनी आज केला. 

 स्वनिधी उभारून कामे पुर्ण करू

महाजन म्हणाले, महापालिका निवडणुकीपुर्वी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचे पालकत्व स्विकारताना विकासाचा शब्द दिला होता. विविध कामांच्या माध्यमातून तो शब्द पुर्ण केला जात आहे. दिड वर्षे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने निधी दिला जात नाही. परंतू असे असले तरी महापालिकेने स्वनिधी उभारून कामे पुर्ण करू. 

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

भाजप-मनसे युतीचे संकेत 
राज ठाकरे व भाजपचे विचार मिळते-जुळते आहे. त्यामुळे राजकारणात काही सांगता येत नाही. महापालिका निवडणुकीत मनसे सोबत युती करण्याचा प्रस्ताव अद्याप आला नसला तरी वेळ पडल्यास विचार करू असे सांगताना महाजन यांनी महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युतीचे संकेत दिले. 

शिवसेनेला शुभेच्छा 
आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून शंभर पेक्षा अधिक जागेचा दावा केला जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सेनेला शुभेच्छा देताना घोडा मैदान जवळ असल्याने दावा किती प्रबळ आहे हे स्पष्ट होईल, भाजप विकासाच्या मुद्यावर निवडणुक लढवेल. महापालिकेची सत्ता भाजपकडेचं राहील. पहिल्या पेक्षा अधिक जागा भाजपच्या राहतील असा दावा महाजन यांनी केला. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

शहरात रस्ते, जलकुंभ कामांच्या शुभारंभ महाजन व माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाला. त्यानंतर भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलतं होते. महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागुल, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सिमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीष पालवे, सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.