“महापालिकेवर झेंडा कुणाचा, हे लोक ठरवतील” – छगन भुजबळ

नाशिक : नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीत कोणता झेंडा फडकावयचा? हे नाशिकमधील लोकच ठरवतील. मलाही वाटते, की माझ्याच पक्षाचा झेंडा नाशिक महापालिकेवर फडकवावा. मात्र, त्यावर आताच बोलणे योग्य नाही, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (ता. १०) येथे सांगितले. 

सत्ता  कुणाची हे मतदार ठरवतील

शिवसेनेने काही दिवसांपासून नाशिक शहरातील संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच विविध पक्षांतील नाराजांसह स्वपक्षातील पदाधिकारी पुन्हा शिवसेनेत घेण्यास सुरवात केली आहे. येथे झालेल्या बैठकीत नाशिक महापालिकेवर शिवसेनेचे भगवा फडकाविण्याचे आवाहन शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केले. त्याविषयी विचारले असता, त्यावर भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, की प्रत्येक पक्षाला विस्ताराचा हक्क आहे. त्यांना जसे वाटते, तसे मलाही वाटते. नाशिक महापालिकेवर माझाच झेंडा असावा, पण महापालिका निवडणुकांना उशीर आहे. महापालिकेवर कुणाची सत्ता असावी, हे नाशिकचे मतदार ठरवतील. 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

भुजबळ म्हणाले... 

-तिन्ही पक्षांचे नेते घेतील औरंगाबाद नामांतराबाबत निर्णय 
-राज्यात बर्ड फ्लूची एकही घटना नाही, शासन लक्ष ठेवून 
-फायर ऑडिटसाठी खासगी संस्थांची मदत 
-वायरिंग, आगप्रतिरोधक यंत्राच्या दुरुस्तीलाच प्राधान्य 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप