महाबळेश्‍वरपेक्षा नाशिक ‘कुल-कुल! पारा घसरला १५ अंश सेल्सिअसच्या खाली

नाशिक : महाबळेश्‍वरपेक्षा ‘कुल कुल' अशी म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आलीय. कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा सध्या सुरू असताना किमान पारा १५ अंश सेल्सिअसच्या खाली घसरला.

किमान पारा १५ अंश सेल्सिअसच्या खाली

गर्दी वाढली अन् प्रदूषणाची जोड मिळाल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होणार असल्याचे अभ्यासक सतत सांगत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता.३) नाशिकचे किमान तापमान १३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. महाबळेश्‍वरमध्ये १४.१, सातारा- १४.५, जळगाव- १४.२, औरंगाबाद- १४.२ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात सर्वांत कमी ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद गोंदियात झाली. दिवाळीपूर्वी पारा घसरत असताना दिवाळीत किमान तापमान वाढत गेले आणि २० अंश सेल्सिअसपर्यंत नोंद झाली होती.  

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच