सिडको . : पुढारी वृत्तसेवा- जुन्या जकात नाक्यासमोर नाशिक मुंबई महामार्गावर घंटागाडीने दुचाकी ला दिलेला अपघातात दुचाकी चालक ठार झाल्याची घटना घडली आहे. तर एक जण जखमी आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कलाम सुलेमान अन्सारी (वय ३९, रा खोडाळा, ता. मोखाडा जि पालघर ) असे मयताचे नाव आहे. तर प्रदीप पांडुरंग शिंदे हा दुचाकीवर मागे बसला असल्याने तो जखमी झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक एम एच ४८ सी.एफ. ३९५६ हिने नाशिककडून मुंबईच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला. पाठीमागून भरगाव वेगाने येणारी घंटागाडी क्रमांक एम एच १५ एच एच ७९५० जोरदार दूचाकीला धडक दिली. आणि यात दुचाकी चालकाच्या शरीरातून तसेच डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागेवर मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेला प्रदीप शिंदे हा जखमी झाला. यावेळी घटनास्थळी काही वेळासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. वाहतुकीची कोंडी देखील झाली होती, एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली. मयत अन्सारी यांचा मोखाडा येथे टायर पंचर काढण्याचे दुकान आहे . त्याच्या पश्यात पत्नी दोन मुले असा परिवार आहे . या प्रकरणी घंटागाडी चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पुढील तपास पोलिस चौकीचे हवालदार एस . बी झोले व दिपक जगताप करीत आहेत .
The post महामार्गावर घंटागाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.