महाराष्ट्र पोलिस मित्र परिवाराचे नाशिकचे पदाधिकारी जाहीर

पोलिस मित्र www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य पोलिस मित्र परिवार संघाच्या वतीने नाशिक शहर व जिल्हा पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहे.

राज्य पोलिस मित्र परिवार संघाची बैठक रेडक्रॉस येथे खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष रमेश सुरवसे-पाटील यांच्या अनुमतीने राज्य महासचिवपदी राहुल जोरे-पाटील, तर राज्य कार्याध्यक्षपदी सुनील परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर कार्याध्यक्ष परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हा आणि शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली. याप्रसंगी पोलिस मित्र परिवार संघाचे वीरेंद्रसिंग टिळे, श्रद्धा कोतवाल, प्रकाश बर्वे, पूनम मालुसरे, मंगल मोकळ, कल्पना पवार, योगेश पाटील, अभिशेख मानकर, भाऊसाहेब बाराहाते, रणजित परदेशी, अमोल कदम, वनिता बायस आदींसह विविध भागांतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकारिणी अशी : नाशिक शहर अध्यक्ष – अक्षय मराठे, महिला अध्यक्ष – रोहिणी कुमावत, जिल्हा कार्याध्यक्ष-प्रकाश उखाडे, जिल्हाध्यक्ष – सतीश अलई, ग्रामीण जिल्हाध्यक्ष – राहुल देवरे, ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष – सुषमा बोरसे याशिवाय नाशिकरोड विभाग पुरुष अध्यक्ष – ॲड. राकेश आडके, महिला अध्यक्ष – पूजा जाधव, पंचवटी विभाग महिला अध्यक्ष – भारती माळी, उपाध्यक्ष – मंजूषा लोहगावकर, नाशिक (मध्य) विभाग पुरुष अध्यक्ष – अब्बासी हुसेनी, आयटीसेल प्रमुखपदी सतूप्पा पाटील यांची झालेल्या विशेष बैठकीत सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा:

The post महाराष्ट्र पोलिस मित्र परिवाराचे नाशिकचे पदाधिकारी जाहीर appeared first on पुढारी.