महिला दिनीच जगण्यातून मुक्त व्हायचा ‘ति’चा निर्णय; माणुसकी आली देवदूत बनून!

नाशिक : 8 मार्चला एकीकडे महिला दिन हा संपूर्ण देशात साजरा होत होता. ठिकठिकाणी स्त्रीशक्तीला नमन करण्यात येत होते. नारीच्या प्रत्येक रुपाला वंदन करत होते. पण अशातच दुसरीकडे मात्र संवदेनशीलतेची प्रतिमा समजल्या जाणाऱ्या महिलेने त्या दिवशी असा निर्णय घेतला. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.  जीवनाचे मोल आणि संतापात घेतलेला एक निर्णय आपल्यासाठी किती नुकसानदायक ठरू शकतो. याचे महत्व देवदूत बनून आलेल्या तरुणांनी पटवून दिले आहे. काय घडले नेमके?

महिला दिनीच जगण्यातून मुक्त व्हायचा 'ति'चा निर्णय

सिडको भागातील उत्तम नगर येथे राहणारी  एक महिला चक्क पंख्याला साडी बांधून आत्महत्या करताना आढळली. त्यावेळेस त्या महिलेच्या मुलीने सामाजिक कार्यकर्ते संजय भामरे यांना फोन करून माहिती दिली.  त्यावेळेस तेथे संजय भामरे, देवाजी पाटील, प्रशांत जाधव, प्रकाश गुजर, समाधान ठोके, संदीप पवार, पवन मटाले,ओम सोनवणे आदी त्यांच्या घरी पोहोचले. आणि तिला आत्महत्या करण्यापासून रोखले. तसेच त्या महिलेची समजूत घातली. या घटनेची माहिती प्रशांत जाधव यांनी तात्काळ अंबडचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांना कळवली असता, त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोलीसांची टीम पाठवली. यावेळी महिलेने असे करण्यामागे कारण सांगितले.

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

महिलेने सांगितले कारण

यावेळी महिला आणि त्यांची मुलगी यांना पोलीस स्टेशनला बोलावले आणि त्यांचे समुपदेशन केले. पण या महिलेला तिचा पती उदरनिर्वाहासाठी काहीही देत नसल्याने तिच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनपासून या महिलेचे काम बंद झाल्यामुळे उपजीविकेचे कुठलेही साधन त्यांना उरले नाही. त्यामुळे त्या महिलेने  आत्महत्या करण्याचा विचार केला होता. या महिलेचा पती हा नाशिक महापालिका मधील निवृत्त अधिकारी आहे. त्याला अंबड पोलीस स्टेशनमध्ये बोलावून योग्य ती समज देण्यात आली. त्याप्रसंगी पी.एस.आय राकेश शेवाळे यांनी त्या महिलेची समजूत काढली आणि आत्महत्या न करण्याचा सल्ला दिला व त्या महिलेच्या मुलीस कंपनीत नोकरी लावून देण्यासाठी प्रयत्न करू असेही सांगितले.

हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर

याच खऱ्या महिला दिनाच्या शुभेच्छा ठरल्या

यावेळी सर्वांनी केलेले कार्य हेच खरे समाजपयोगी आहे आणि एका महिलेला आत्महत्या करण्यापासून थांबवले आणि महिलेचा जीव वाचवला याच महिला दिनाच्या शुभेच्छा आहे,