मागच्या महिन्यात साखरपुडा; लग्नाची तारीख ठरली, भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाचा दुर्दैवी अंत

सिन्नर (जि.नाशिक) :  शुभमचा गेल्या महिन्यातच साखरपुडा झाला होता, लग्नाची तारीखदेखील ठरली होती. अशातच शुभमची अचानक एक्झिट झाल्याने सिन्नरच्या कपोते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माजी उपनगराध्यक्षा व भाजपचे जिल्हा पदाधिकारी यांचा तो मुलगा आहे.

लग्नाची तारीखदेखील ठरली होती.
सिन्नरच्या माजी उपनगराध्यक्षा राजश्री कपोते व भाजपचे जिल्हा पदाधिकारी राजेंद्र कपोते यांचा तो मुलगा आहे. कपोते कुटुंबीय नाशिक येथे स्थायिक झाले असून, व्यवसायानिमित्त रोज ये-जा करतात. शुभम राजेंद्र कपोते (वय २४) आपल्या कारने (एमएच-१५-जीए- ४१४१) नाशिककडे जात होता. सायंकाळी नाशिककडे जात असताना कंटेनरखाली कार गेल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शुभमच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. शुभमचा गेल्या महिन्यातच साखरपुडा झाला असून, लग्नाची तारीखदेखील ठरली होती. रात्री उशिरा संगमनेर नाका येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय! 

सिन्नरच्या कपोते कुटुंबावर दुःखाचा डोंगर 

सिन्नर-नाशिक महामार्गावर चिंचोली येथील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर पुलावर पुढे चालणाऱ्या कंटेनरखाली कार शिरल्याने झालेल्या अपघातात सिन्नर येथील सराफी व्यावसायिक तरुण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना