माजी खासदार युवराज संभाजीराजे : नासाकाच्या माध्यमातून शेतकरी, कामगार कष्टकऱ्यांची भरभराट व्हावी

संभाजीराजे- www.pudhari.news

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा

गेली नऊ वर्ष बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामापासून सुरू होत आहे. ही आनंदाची बाब असून कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, कष्टकरी जनतेची भरभराट व्हावी असे प्रतिपादन माजी खासदार युवराज संभाजीराजे यांनी कारखाना कार्यस्थळावर केले.

माजी खासदार युवराज संभाजीराजे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून स्वराज्य संघटनेच्या शाखांचे गावोगावी उद्घाटन करीत आहेत. नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर वडगाव पिंगळा हद्दीमध्ये शाखा उद्घाटनासाठी आले असता नाशिक साखर कारखाना हा खा. हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे, हा कारखाना सुरू होणे कामी खा. गोडसे व त्यांच्या सहकाऱ्यांना मदतीसाठी सदैव तयारी दर्शवली. त्याचे फलित मंगळवार, दि.1 कारखाना सुरू झाला आहे, ही समाधानाची बाब आहे, खा. गोडसे यांची काम करण्याची पद्धत चांगली असून निश्चितच कारखान्याच्या सर्व घटकांना चांगले दिवस येतील असा आशावाद व्यक्त केला. शेतकरी कामगार ,कष्टकारी जनतेच्या काही समस्या असतील तर त्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून मार्गी लावल्या जातील असेही त्यांनी सांगितले.

यावेळी कारखान्याचे संचालक शेरझाद पटेल, सागर हेमंत गोडसे, कार्यकारी संचालक सुकदेव शेटे यांनी कारखाना प्रशासनाच्या वतीने संभाजीराजे यांचे स्वागत केले. यावेळी स्वराज्य संघटनेचे राज्य प्रवक्ते करण गायकर, धनंजय जाधव जिल्हा निमंत्रण गणेश कदम, तुषार जगताप, केशव गोसावी, अंकुश कदम, विनोद साबळे, आप्पासाहेब कुडेकर ,गंगाधर काळकुटे, महादेव देवकर ,माऊली पवार, विलास गायधनी, शिवा तेलंग, रुपेश नाठे, विजय खर्जुल, दत्ता हरळे आदी मान्यवर उपस्थित होते. शाखाप्रमुख अजित मुठाळ रितेश चव्हाण यांनी देखील शाखेच्या वतीने त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमास समाधान काळे, सचिन चौधरी, सागर शिंदे, अजित चौधरी आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच स्वराज्य संघटनेचे राज्य प्रवक्ते करण गायकर, धनंजय जाधव जिल्हा निमंत्रण गणेश कदम, तुषार जगताप, केशव गोसावी, अंकुश कदम, विनोद साबळे, आप्पासाहेब कुडेकर ,गंगाधर काळकुटे, महादेव देवकर ,माऊली पवार, विलास गायधनी, शिवा तेलंग, रुपेश नाठे, विजय खर्जुल, दत्ता हरळे आदी मान्यवर उपस्थित होते. शाखाप्रमुख अजित मुठाळ रितेश चव्हाण यांनी शाखेच्या वतीने स्वागत केले. या कार्यक्रमास समाधान काळे, सचिन चौधरी, सागर शिंदे, अजित चौधरी आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

हेही वाचा:

The post माजी खासदार युवराज संभाजीराजे : नासाकाच्या माध्यमातून शेतकरी, कामगार कष्टकऱ्यांची भरभराट व्हावी appeared first on पुढारी.