जळगाव पुढारी वृत्तसेवा : जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील माजी सैनिकाच्या मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साडेआठ लाख रुपयांत फसवणूक केली. याप्रकरणी जामनेर पोलिसांत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथे राहणारे माजी सैनिक रघुनाथ रामदास न्हावकर यांना सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी येथे राहणारे सुधाकर मधुकर मोटे यांनी तुमच्या मुलाला भू अभिलेखन येथे नोकरी लावून देतो. असे सांगून ऑनलाइन रोख आठ लाख 50 हजार रुपये घेतले व नोकरी न लावता त्यांची पैसे घेऊन फसवणूक केली. याबाबत रघुनाथ न्हावकर यांनी जामनेर न्यायालयात फौजदारी दाखल केली होती न्यायालयाच्या आदेशाने जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
डॉक्टरांनी फसवले चार लाखात
ग्रामसेवकाने शासनाची केली पाच लाख 58 हजारांत फसवणूक
जळगाव : तालुक्यातील उमाळा येथील ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक यांनी पाणीपट्टी घरपट्टी ओरिजनल पावती पुस्तकात, ग्रामनिधी मध्ये व बनावट पावती पुस्तक वापरून 5 लाख 58 हजार पाचशे सहा रुपयांचा बँकेत भरणा न करता अपहार केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात ग्राम विस्तार अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव तालुक्यातील उमाळा या ठिकाणी तत्कालीन ग्रामसेवक संदीप चंद्रभान निकम हे असताना त्यांनी पाणीपट्टी व घरपट्टी याच्या ओरिजिनल पावती पुस्तकांमध्ये पाणीपुरवठा वसुलीमध्ये सहाशे रुपये ग्रामनिधी मध्ये चार लाख 14 हजार 400 रुपये तसेच बनावट पावती पुस्तक चा वापर करून एक लाख 43 हजार पाचशे सहा रुपये असा एकूण पाच लाख 58 हजार पाचशे सहा रुपयांचा रकमेचा भरणा बँकेत न करता त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला व अपहार केला. या प्रकरणी राजेश धोंडू इंगळे विस्तार अधिकारी पंचायत समिती जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन ग्रामसेवक संदीप निकम यांच्याविरुद्ध फसवणूक तिचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गणशे करीत आहेत.
The post माजी सैनिकाच्या मुलाला साडेआठ लाखांना गंडा appeared first on पुढारी.