मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचे निधन

नाशिक : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचे आज (ता.३) सकाळी सात वाजता covid-19 याच्या संसर्गामुळे निधन झाले. ‌गेल्या एक आठवड्यापासून ते आजारी होते. सुरुवातीला किर्लोस्कर हॉस्पिटल व नंतर डॉक्टर कराड हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

सुमारे पाच दशके भरीव कार्य

मध्यंतरीच्या काळात प्रकृती सुधारत असतानाच काल (ता.२) सायंकाळी त्यांची प्रकृती गंभीर होत गेली व आज सकाळी (ता.३) त्यांची प्राणज्योत मालवली. श्रीधर देशपांडे यांनी विमा कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून सुमारे पाच दशके भरीव कार्य केले. त्याबरोबर डावे पुरोगामी संघटना यांच्याबरोबर त्यांचा घनिष्ठ संबंध होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या व सिटू संघटनेमध्ये त्यांनी नेतृत्व दायी भूमिका बजावली.

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

पुरोगामी चळवळीची फार मोठी हानी

जिल्ह्यातील बंद पडलेल्या बँका व पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या धड्याचे त्यांनी नेतृत्व केले व न्याय मिळवून दिला. नाशिक शहरातील व जिल्ह्यातील विविध पक्ष व संघटनेतील नेत्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते. ते कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होते .शेतकरी कामगार यांच्या चळवळी बरोबरच वर्तमानपत्रांमधून ते सातत्याने लिखाण करत असत. देशपांडे यांच्या निधनाने डाव्या पुरोगामी चळवळीची फार मोठी हानी झाली आहे .

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी