मार्चमध्ये कोरोनाबाधितांचा आलेख चढता! कोरोनाबाधितांचे प्रमाण लक्षणीय

नाशिक : फेब्रुवारीच्‍या अंतिम काही दिवसांमध्ये कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गामुळे मार्चमध्येही कायम आहे. नाशिक शहरात कोरोनाबाधितांच्‍या संख्येत वाढ होत आहे. जिल्‍ह्यातील अन्‍य भागांच्‍या तुलनेत नाशिक महापालिका हद्दीत आढळणाऱ्या कोरोनाबाधितांचे प्रमाण लक्षणीय आहे. मार्चमध्ये गेल्‍या सात दिवसांत रविवार (ता. ७)पर्यंत नाशिक शहरात एक हजार ८३६ कोरोनाबाधित आढळून आले, तर या कालावधीत कोरोनामुळे नऊ रुग्‍णांचा बळी गेला. 

शारीरिक अंतर पाळले जात नसल्‍याचेही दृश्य
१५ फेब्रुवारीपासूनच शहरात कोरोनाचा फैलाव वाढण्यास सुरवात झाली. तरीही शहरात अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधासाठी लावलेले नियम व निर्बंध धाब्‍यावर बसवत नागरिक सर्रासपणे फिरताना दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणांवर लक्षणीय गर्दी होत आहे. शारीरिक अंतर पाळले जात नसल्‍याचेही दृश्य अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे.

सात दिवसांत एक हजार ८३६ पॉझिटिव्‍ह; नऊ रुग्‍णांचा मृत्‍यू

मास्‍क वापराच्‍या प्रमाणात वाढ झाली असली, तरी ठराविक परिसरामध्ये मास्‍ककडेही कानाडोळा केला जात असल्‍याची स्‍थिती आहे. गेल्‍या १ मार्चपासून रविवारपर्यंत नाशिक महापालिका हद्दीत एक हजार ८३६ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर नऊ रुग्‍णांचा कोरोनामुळे बळी गेला. अशीच परिस्‍थिती कायम राहिल्‍यास येत्‍या काही दिवसांमध्ये शहरी भागात निर्बंध येण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

सात दिवसांत अकरा हजार चाचण्या 
मार्चमध्ये रुग्‍णसंख्येत वाढ होताना चाचण्यांचे प्रमाणही वाढले आहे. रविवारपर्यंत ११ हजार २८१ संशयितांच्‍या चाचण्या करण्यात आल्‍या. यांपैकी सात हजार ४५७ संशयितांचे अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत, तर एक हजार ८३६ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ९८८ संशयितांचे अहवाल प्रलंबित होते. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

गेल्‍या सात दिवसांत शहरातील स्‍थिती 
तारीख पॉझिटिव्‍ह बरे झालेले रुग्‍ण मृत्‍यू 

१ मार्च ५९ १६१ १ 
२ मार्च २६६ १५७ ३ 
३ मार्च २२० ११२ ० 
४ मार्च ३४९ १७९ १ 
५ मार्च २२२ १९१ २ 
६ मार्च ४०६ १७८ २ 
७ मार्च ३१४ २१४ ०