मालधक्का रोडवरील आगीत नुकसानग्रस्त कुटुंबे उघड्यावर; मदतीपासून अजूनही वंचित

नाशिक रोड : येथील मालधक्का रोडवर लागलेल्या आगीत १२ कुटुंबांची घरे भस्मसात झाली. ४० ते ४२ लोक सध्या उघड्यावर राहत असून, परिसरातील लोक त्यांच्या जेवणाची व्यवस्था करीत आहेत. शासकीय मदतीपासून ही कुटुंबे अजूनही वंचित राहिलेले आहेत. केवळ पंचनाम्यापुरते सोपस्कार प्रशासनाने पार पाडले आहेत. 

मदतीपासून ही कुटुंबे लाखो मैल दूरच

सहा दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत मालधक्का रोड, पवारवाडी येथील बारा घरे भस्मसात झाली. कपडे, महत्त्वाची कागदपत्रे यांच्यासह सर्वकाही जळून खाक झाले आहे. १२ कुटुंब मिळून ४२ लोक सध्या उघड्यावर जीवन जगत आहेत. परिसरातील सनी वाघ, समीर शेख हे सामाजिक कार्यकर्ते व रहिवासी त्यांना अन्नदान करीत आहेत. ही कुटुंबे मदतीसाठी याचना करीत आहेत. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी केवळ फेरफटका मारून यांना धीर दिला आहे. मात्र, प्रत्यक्ष मदतीपासून ही कुटुंबे लाखो मैल दूरच आहेत. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

मुलीच्या लग्नासाठी चाळीस हजार रुपये साठवून कपाटात ठेवले होते. मात्र, आग लागल्यावर कपाटात पैशांची राख झाली. मुलीचे लग्न कसे करावे, हे समजत नाही. रोज शासकीय लोक येऊन केवळ विचारपूस करून जातात. आसपासचे लोक पोटाला खायला अन्न देतात. मात्र, घर पुन्हा कसे सावरायचे हाच प्रश्न सतावत आहे. 
-भागाबाई खरात, नुकसानग्रस्त 

दिवसभरात काम केल्यानंतर खायला मिळते. आता आमची मुले रस्त्यावर आली आहेत. उघड्यावर झोपतो, सकाळी ब्रशपासून तर रात्री झोपेपर्यंत दिवसभरात लागणाऱ्या सर्व वस्तू भस्मसात झाल्या आहेत. अनेक दिवसांपासून एकच कपड्यावर आहे. आम्हाला शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे. 
-सखाराम कसबे  

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट