मालेगावचा पारा वाढला! एप्रिल-मेमध्ये लग्नसोहळे; वऱ्हाडींचा निघणार घाम 

मालेगाव (जि.नाशिक) : यंदा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच तापमान वाढण्यास सुरवात झाली. दुपारी कडक ऊन पडत असल्याने नागरिक सकाळी व सायंकाळी कामे उरकण्यावर भर देत आहेत. सध्या लग्नसोहळे धुमधडाक्यात सुरू आहेत. एप्रिल-मेमध्ये मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे आहेत. त्यामुळे यंदाही ऊन वऱ्हाडींचा घाम काढणार आहे.  
 

दर वर्षी किमान अडीच महिने पारा ४० अंशांपेक्षा अधिक

शहर व परिसर गेल्या आठवड्यापासून तापू लागला आहे. बुधवारी (ता. ३) येथे ३८.४ अंश तापमान नोंदले गेले. तापमानात वाढ होत असल्याने रसवंतिगृहे, शीतपेय, बर्फाचे गोळे, कुल्फी आदी दुकानांवर गर्दी दिसू लागली आहे. रविवारी (ता. २८) पारा ३८.६ अंशांवर होता. या हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वोच्च तापमान आहे. मंगळवारी (ता. २) ३७.२ अंश एवढे तापमान नोंदले गेले. शहरात दर वर्षी किमान अडीच महिने पारा ४० अंशांपेक्षा अधिक असतो. 

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

 हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा