मालेगावच्या लग्नाच्या वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात; बस अर्धी कापली गेल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

मालेगाव (जि.नाशिक) : गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या अपघातात शहरातील चालकासह चौघे मजूर मालेगावकडे परतताना ठार झाले होते. आठवड्यातील सलग दुसऱ्या अपघातामुळे पूर्व भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मृतांची नावे समजू शकली नाहीत.
 शुक्रवारी (ता. ५) पहाटे व्यारा-बाजीपुरा राष्ट्रीय महामार्गावर वालोदजवळ हा भयंकर अपघात झाला. मालेगाव शहरातील हजारखोली भागातील वऱ्हाडाच्या बसला गुजरातच्या तापी जिल्ह्यात अपघात झाला. यात वऱ्हाडींमधील चाळीसगाव येथील दांपत्य व पिलखोड येथील एक, असे तीन जण जागीच ठार झाले. तर दहा जण गंभीर जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांची नावे समजू शकली नाहीत. गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या अपघातात शहरातील चालकासह चौघे मजूर मालेगावकडे परतताना ठार झाले होते.

काळाने शेख कुटुंबीयांच्या तिघा नातेवाइकांवर घाला

आठवड्यातील सलग दुसऱ्या अपघातामुळे पूर्व भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हजारखोली भागातील शेख अहमद भिकन हाजी (रा. सैलानी चौक) यांचा मुलगा शेख मुदस्सीर याच्या विवाहासाठी शेख कुटुंबाचे चाळीसगाव, पिलखोड, जळगाव, धुळे, नाशिक येथील नातेवाईक लक्झरी बसने सुरत येथे जात असताना हा अपघात झाला. शुक्रवारी दुपारी विवाह सोहळा होता. तत्पूर्वीच काळाने शेख कुटुंबीयांच्या तिघा नातेवाइकांवर घाला घातला.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

बस अर्धी कापली गेल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

पहाटे महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रेलरवर खासगी लक्झरी बस आदळली. या अपघातात दहा जण जखमी झाले असून, त्यांना सोनगढ, व्यारा येथील रुग्णालयात उपचार करून अन्यत्र खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातात बस अर्धी कापली गेल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. वालोद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्ही. आर. वासावा व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जखमींना हलविण्यासाठी सहकार्य केले. अपघातग्रस्त बसमधील वऱ्हाडी हे माजी आमदार रशीद शेख यांचे नातेवाईक आहेत.  

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल