मालेगावच्या सामान्य रुग्णालयात साकारणार 20 हजार लिटरचा ऑक्सिजन टॅंक ! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आदेश

मालेगाव, (जि नाशिक) : शहरासह, राज्यातील कोरोना संसर्गावर निश्र्चित मात करू. येथे ऑक्सिजन व रेमडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे सांगितले. त्यावर मात करण्यासाठी राज्यातील अन्य रूग्णालयांसारखे येथील सामान्य रुग्णालयात वीस हजार लिटरचा ऑक्सिजन टॅंक तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री टोपे यांनी केली नाराजी व्यक्त 

धुळे जिल्हा दौरा करून परतताना वाटेत त्यांनी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात भेट दिली. आरोग्यमंत्री टोपे यांनी सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय सेवेबाबत समाधान व्यक्त केले. त्याचवेळी मनपाने पूर्ण तयारी झाली असताना दिलावर व हज हाऊस येथील कोविड सेंटर सुरु न केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. खासगी रुग्णालयात ऑक्सिजन सिलींडरचा तुटवडा आहे. अन्न औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांना त्यांनी खासगी रुग्णालयात ऑक्सिजन सिलींडर उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. रुग्णांशी त्यांनी संवाद साधला.

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

त्वरित कर्मचारी भरती करा  

महापालिका प्रशासनाने दोन नवीन कोविड उपचार केंद्र तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचारी भरतीसाठी सुचना केली. लक्षणं दिसल्यास ताबडतोब चाचणी करून घ्या असे आवाहन त्यांनी केले. 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

पूर्व भागात लसीकरण मोहीम हाती घ्या.

पूर्व भागात लसीकरण मोहीम राबविण्यासाठी जोमाने काम करा. लोकप्रतिनिधी व नगरसेवकांनी यासाठी सहकार्य करावे. लसीकरण केंद्र वाढवावे. मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. शहरावर आपलं व्यक्तीगत लक्ष असल्याने येथील समस्या प्राधान्याने सोडवू असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. यावेळी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल यांनी मनपा प्रशासनाने कुठलेही नियोजन केले नाही असा आरोप करतानाच, प्रशासनावर त्यांनी कठोर शब्दात टिका केली.

हेही वाचा - सुर्यास्त पाहण्यास गेलेल्या 6 मित्रांच्या ग्रुपमधील २ मित्रांच्या जीवनाचा अस्त