नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मालेगाव तालुक्यामध्ये मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. येथून मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव हज यात्रेसाठी जात असतात. त्यामुळे या ठिकाणी हज हाउस उभारण्यासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मालेगाव शहर व तालुक्यात तसेच नाशिक जिल्ह्यातील अन्य तालुके तसेच मालेगावलगतच्या धुळे जिल्ह्यात मुस्लीमांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सद्यस्थितीत हज यात्रकरूंना यात्रेपूर्वी आवश्यक बाबींच्या पूर्ततेसाठी मुंबई येथील हज हाउस येथे जावे लागते. त्यामुळे यात्रेकरूंचा अतिरिक्त वेळ व पैसा खर्च होतो. मालेगाव शहरात हज हाउस मंजूर झाल्यास मुस्लिमांना हज यात्रेला जाण्यासाठी याचा फायदा होईल. हज हाउस बांधण्यासाठी आवश्यक शासकीय भूखंड मालेगावात उपलब्ध असून, या जागेवर हज हाउस उभारावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
एकाच ठिकाणी सुविधा
मालेगाव-धुळे येथील मुस्लीम बांधवांना हज यात्रा प्रवासानुषंगिक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी मालेगाव शहरातील सर्व्हे नंबर ७८/१/अ या शासकीय भूखंडावर हज हाउस बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भुसे यांनी केली आहे.
हेही वाचा :
- पवना धरणात जूनअखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा
- KCR discharged | तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना रूग्णालयातून डिस्चार्ज
- Hingoli News: दातीफाट्याजवळ बँकेची रोकड नेणारे वाहन उलटून ५ जण जखमी
The post मालेगावमध्ये हज हाउस उभारावे, दादा भुसे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी appeared first on पुढारी.