मालेगावला चार नवीन पोलिस निरीक्षकांची नियुक्ती 

मालेगाव ( जि. नाशिक) : शहरातील पवारवाडी, कॅम्प, किल्ला व तालुका पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकपदाचा पदभार नवीन पोलिस निरीक्षकांकडे सोपविण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर तालुका पोलिस निरीक्षक नरेंद्र भदाणे तसेच पवारवाडीचे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली झाली.

भदाणे यांच्या जागेवर तालुका निरीक्षक म्हणून देवीदास ढुमणे, तर पाटील यांच्या जागेवर पवारवाडी पोलिस निरीक्षकपदी वसंत भोये यांची नियुक्ती झाली. किल्ला पोलिस ठाण्याचे निरीक्षक म्हणून दिगंबर भदाणे तर कॅम्प पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी प्रकाश मुंडे यांची नियुक्ती झाली. छावणी पोलिस ठाण्याचा पदभार प्रवीण वाडिले यांच्याकडे, तर शहर पोलिस ठाण्याचा पदभार रवींद्र देशमुख यांच्याकडे आहे. कॅम्प पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.  

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच