मालेगावात पुन्हा गोळीबार ; धाक दाखवून व्यापार्‍याला लुटण्याचा प्रयत्न

मालेगावात गोळीबार ,www.pudhari.news

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली. गावठी कट्टा, कोयत्याचा धाक दाखवून व्यापार्‍याला लुटण्याचा प्रयत्न जागरुक नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. मात्र, लुटारूंनी गोळी झाडल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने कुणी जखमी झाले नाही. दरम्यान, या प्रकरणी एका संशयिताला पवारवाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरेगाव शिवारातील फेमस मार्केट परिसरात गुरुवारी (दि. 4) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. सोयगावमधील व्यापारी दिनेश रुंग्ठा (48) यांचा गिट्टी कारखाना आहे. ते नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात पोहोचले. आपल्याजवळील रोख 50 हजार रुपये त्यांनी ड्रॉवरमध्ये ठेवले. ते लुटण्यासाठी चौघांनी कार्यालयात प्रवेश केला. त्यांच्याजवळ कोयता, गावठी कट्टा आदी प्राणघातक शस्त्र होती. परंतु, रुंग्ठा यांनी प्रतिकार केला. आजूबाजूच्या नागरिकांनीही धाव घेतल्याने लुटारूंची भंबेरी उडाली. त्यात एकाने कट्ट्यातून फायर करीत दहशत निर्माण केली.

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात संशयित सईद अहमद, शहजाद मेहमूद, यासीन, राजू यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post मालेगावात पुन्हा गोळीबार ; धाक दाखवून व्यापार्‍याला लुटण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.