मालेगावात वृद्ध दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

मालेगाव: दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू,www.pudhari.news

मालेगाव मध्य : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
शहरातील हिंगलाजनगर भागात राहणारे अल्ताफ हुसेन मोहंमद सईद (65) व अल्कमा आलताब हुसेन (55) या वृद्ध दाम्पत्यांचे मृतदेह संशयास्पद स्थितीत मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दाम्पत्यांचे मृतदेह दोन वेगवेगळ्या खोलीत मिळून आल्याने हत्या की आत्महत्या असा प्रश्न उभा ठाकला असून, त्याची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असेल.

गुरूवारी (दि.17) हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलिस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी भेट दिली. याप्रसंगी बघ्याची एकच गर्दी झाली होती.

राहत्या घरात वेगवेगळ्या रुममध्ये दाम्पत्याचा मृतदेह आढळले. अल्ताफ हुसेन यांचा मृतदेह डोक्याला मार लागल्याचे, तर अल्कमा यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. हे वृद्ध दाम्पत्या घरात एकटेच राहत असल्यामुळे त्यांच्यावर लुटमार किंवा हल्ला करुन त्यातून खून झाला की अन्य कारणामुळे याचा तपास पोलिस करीत आहेत. नातेवाईक, रहिवासी यांची चौकशी करुन जबाब नोंदविले जात आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला असून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दाम्पत्याला तीन मुली आणि एक मुलगा आहे. दोन मुली त्याच गल्लीत राहतात. तर मुलगा नोकरी धंद्यानिमित्त बाहेरगावी असतो.

हेही वाचा :

The post मालेगावात वृद्ध दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान appeared first on पुढारी.