मालेगावात हरणांच्या मांसासह तिघांना अटक; वन विभाग, विशेष पोलिस पथकाची कारवाई 

मालेगाव (जि. नाशिक) : शहराजवळील दरेगाव शिवारातील गट नंबर ६८ मधील पत्र्याच्या शेडमध्ये उपवन विभाग व विशेष पोलिस पथकाने छापा टाकून तीन संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन हरणांचे २५ किलो मांस, दुचाकी, वजनकाटे असा एक लाखाचा ऐवज जप्त केला. यातील संशयित सराईत असून, ते सातत्याने हरणाचे मांसविक्री करीत असल्याची माहिती मिळाली. तिघांविरुद्ध वन विभागाने गुन्हा दाखल केला. 

एक लाखाचा ऐवज जप्त

दरेगाव भागात काही जण हरणांचे मांस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना मिळाली. खांडवी यांनी विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर घुगे यांना वन विभागाशी संपर्क करून कारवाईच्या सूचना केल्या. खांडवी, उपविभागीय वनाधिकारी जगदीश येडलावार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विलास कांबळे,  घुगे यांच्या संयुक्त पथकाने दरेगाव शिवारात छापा टाकला. शेडमध्ये मुद्स्सीर अहमद अकिल अहमद (३७, रा. चुनभुट्टी बेलबाग), शब्बीर शेख रजाक (४१), मुबीन सय्यद हारुन (४३, दोघे रा. कमालपुरा) यांनी चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करून आणलेले मांस तुकडे करून विकण्याच्या तयारीत असताना आढळले. पथकाने त्यांच्या ताब्यातून हरणांचे २५ किलो मांस, होंडा कंपनीची दुचाकी, कुंदा (लाकडी ठोकळा), वजनकाटा असा लाखाचा ऐवज जप्त केला. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळब

तीन संशयितांना अटक झाली. श्री. कांबळे, श्री. घुगे, वनपाल आर. व्ही. देवरे, बी. एस. सूर्यवंशी, वनरक्षक एस. बी. शिर्के, आगाररक्षक आर. के. बागूल, रफिक पठाण, टी. जी. देसाई, हवालदार वसंत महाले, विकास शिरोळे, पोलिस शिपाई संदीप राठोड, भूषण खैरनार, पंकज भोये आदींनी ही कारवाई केली.  

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश