मालेगावी वाहनासह 94 लाखांचे मद्य जप्त

मालेगाव मद्यसाठा जप्त,www.pudhari.news

मालेगाव मध्य (जि. नाशिक) :  तालुक्यातील सौंदाणे शिवारातील मुंबई- आग्रा महामार्गावरील सौंदाणी शिवारात हॉटेल तुळजाई समोर मालेगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत वाहनासह 94 लाखांचा मद्य साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी मद्यसाठा घेणारा, पुरवठादार व वाहनमालक यांच्या विरोधात व इतर ज्ञात -अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

मालेगाव विभाग राज्य उत्पादन शुल्क पथकाला मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.6) ही कारवाई करण्यात आली. पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर, सौंदाणे शिवारात दारुबंदी गुन्हयाकामी सापळा रचून वाहन तपासणी करतांना आयशर कंपनीचे सहाचाकी मालवाहतुक वाहन (जीजे 35 टी 3538) अडवले. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवा राज्यात निर्मिती व विक्री करीता असलेला परराज्यातील मद्याचा साठा मिळून आला. या कारवाईत पथकाने वाहनासह 900 बॉक्स विदेशी मद्य व बियरचा साठा असा एकूण 94 लाख 24 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहनचालक कमलेश भारमल राम यास अटक करण्यात आली असून मद्यसाठा घेणारा, पुरवठादार व जप्त वाहनमालक यांचे विरोधात व इतर अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दशरथ जगताप, दुय्यम निरीक्षक हर्षराज इंगळे, पंढरीनारथ कडभाने, येवला विभागाचे निरीक्षक व्ही. ए. चौरे, दुय्यम निरीक्षक एस. आर. वाकचौरे, पी. आर. मंडलीक, सहा. दुय्यम निरीक्षक वंदना देवरे, अवधुत पाटील व जवान दिपक गाडे, शाम पानसरे, प्रविण अस्वले, डिगंबर पालवी, विठ्ठल हाके, अमन तडवी, संतोष मुंडे, मुकेश निंबेकर यांच्या पथकाने हे कारवाई केली. पुढील तपास निरीक्षक दशरथ जगताप करीत आहेत.

हेही वाचा :

The post मालेगावी वाहनासह 94 लाखांचे मद्य जप्त appeared first on पुढारी.