मालेगाव : एक तास अगोदर होणार विभागीय बैठक, तयारीत प्रशासनाची कसोटी

एकनाथ शिंदे

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे नियोजित मालेगाव च्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी (दि. ३०) सकाळी १० वाजता ते विभागीय आढावा घेणार होते. त्यानुसार बैठकीचे नियोजन केले जात असताना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. पावसाच्या व्यत्ययामुळे सभा आणि बैठक स्थळावरील काम प्रभावित झाले. परिणामी मध्यरात्रीपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूणच यंत्रणा पाणी काढून साफसफाई, बैठक व्यवस्था लावण्यात व्यस्त होते.

त्यातच सकाळची विभागीय बैठक एक तास अगोदर म्हणजे ९ वाजता घेण्याचे सुधारित नियोजन जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यामुळे युद्ध स्तरावर कामाला गती देण्यात आली. दरम्यान मध्य रात्री एकनाथ शिंदे मालेगावात दाखल झाले. आमदार दादा भुसे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

The post मालेगाव : एक तास अगोदर होणार विभागीय बैठक, तयारीत प्रशासनाची कसोटी appeared first on पुढारी.