मालेगाव : चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीची बसला धडक; तिघांपैकी दोघे गंभीर

Accident in Maharashtra

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : मालेगाव-नामपुर रस्त्यावरील अजंग शिवारात बसला विरुद्ध दिशेने ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीने धडक दिली. मंगळवारी (दि. ४) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

बसचालक प्रशांत चव्हाण (४७) यांनी वडनेर खाकुर्डी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मालेगावच्या दिशेने येणाऱ्या बसला (एम एच ४० एन ८६०९) अजंग शिवारात नामपूरकडून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने (एम एच १५ सी झेड ५३१४) चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र ताबा सुटल्याने दुचाकीस्वाराची बसला धडक झाली. यात रवींद्र संजय खैरनार (२२, आनंदपूर), मनोज अशोक मोरे (२०, जायखेडा) आणि एक अन्य एक असे तिघे जखमी झाले. त्यांना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते आहे. या घटनेचा तपास हवालदार विश्वास पाटील हे करत आहेत.

The post मालेगाव : चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीची बसला धडक; तिघांपैकी दोघे गंभीर appeared first on पुढारी.