मालेगाव तालुक्यात ५० ग्रामपंचायतींचे कारभारी ठरणार! सदस्याने मागणी केल्यास गुप्त मतदान

मालेगाव (जि.नाशिक) : तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच शांततेत झाल्या. सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीस झालेल्या विलंबामुळे सरपंच, उपसरपंच निवडणुका लांबल्या होत्या. ९९ पैकी ५० ग्रामपंचायतींचे कारभारी शुक्रवारी (ता. १२) ठरणार आहेत. १२ ते १५ फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांत सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी यापूर्वीच निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी सांगितले. 

९९ पैकी ५० ग्रामपंचायतींचे कारभारी ठरणार
सरपंच, उपसरपंच निवडणूक जाहीर होताच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. खात्री नसलेल्या व दगाफटका होण्याची शक्यता असलेल्या सरपंचपदाच्या इच्छुक उमेदवारांनी सदस्यांना पर्यटनाला नेले आहे. शुक्रवारी निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींचे बहुसंख्य सदस्य गुरुवारीच गावात दाखल झाले. निवडणुकीसाठी ५० निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी दहा ते दुपारी बारा अशी वेळ देण्यात आली आहे. दुपारी दोनपर्यंत अर्ज मागे घेण्यात येईल. यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सभेचे कामकाज सुरू होईल. हात उंचावून मतदान घेतले जाईल. एखाद्या ग्रामपंचायतीत सदस्याने मागणी केल्यास गुप्त मतदान घेण्यात येईल, असे श्री. राजपूत यांनी सांगितले. उर्वरित ४९ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक सोमवारी (ता. १५) होईल. 

हेही वाचा - लग्नाच्या दोनच दिवसांत नवरी पसार! पुण्यातील नवरदेवाची लाखोंची फसवणूक

पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायती अशा : 
जळगाव (निं.), निमगाव, कळवाडी, खाकुर्डी, चिंचावड, वडगाव, दहिवाळ, टेहेरे, आघार बुद्रुक, तळवाडे, पिंपळगाव, वडेल, रावळगाव, डाबली, अजंग, मेहुणे, टाकळी, सोनज, वऱ्हाणे, चंदनपुरी, देवघट, ज्वार्डी बुद्रुक, येसगाव बुद्रुक, चिखलओहोळ, झाडी, झोडगे, लेंडाणे, खडकी, साजवहाळ, अस्ताने, चिंचगव्हाण, पाडळदे, भिलकोट, आघार खुर्द, शेंदुर्णी, कंधाणे, कजवाडे, कुकाणे, कौळाणे गा., डोंगराळे, दहिदी, वनपट, हाताणे, वळवाडे, सवंदगाव, जळकू, लोणवाडे, दसाणे, सिताणे, घाणेगाव.  

हेही वाचा - ऑनलाइन गेम ठरतायत विद्यार्थ्यांच्या भविष्याला घातक! मानसिक गुंता सोडविण्यासाठी तज्ज्ञांकडे गर्दी