
पुढारी ऑनलाईन डेस्क : मासे खाल्ल्याने डोळे सुंदर होतात. आणि मुली पटतात, असे तर्कट आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी मांडले आहे. यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी याचा दाखला देताना अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख केला. नियमित मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर आहेत, असे ते म्हणाले. गावित एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. त्यांचे हे विधान चांगलेच चर्चेत आले आहे. (Vijayakumar Gavit)
धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मच्छिमार बांधवांना मासेमारीचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विजयकुमार गावित (Vijayakumar Gavit) बोलत होते. यावेळी त्यांच्या कन्या डॉ. सुप्रिया गावितही उपस्थित होत्या. दरम्यान, गावित यांनी केलेल्या या विधानामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
तुम्ही ऐश्वर्या रायला चित्रपटामधून बघितली असेल. ऐश्वर्या रॉय बेंगलोरच्या समुद्र किनारी राहत होती. त्यामुळे ती दररोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे सुंदर आहेत. मासे खाण्याचे दोन फायदे आहेत. मासे खाल्ल्याने बाईमाणूस चिकनी दिसते. डोळेपण तरतरीत दिसतात. कुणीही बघितले तरी पटवूनच घेणार. आपली त्वचाही चांगली दिसते. माशांमध्ये एक प्रकारचे तेल असते. त्यामुळे डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी त्याचा चांगला फायदा होता, असेही गावित म्हणाले.
हेही वाचा
- जलजीवन मिशनबाबत सरपंचांसमवेत घेणार आढावा : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
- पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित : निवडणुकांची शक्यता; विकास निधी मुदतीत खर्च करा
- ना. डॉ. विजयकुमार गावित : उत्तम आरोग्यासाठी खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण
The post मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रायसारखे डोळे होतात, मुलीही पटतात: विजयकुमार गावित appeared first on पुढारी.