मासे खाल्ल्यामुळे बाईमाणूस चिकनी दिसते : विजयकुमार गावित

धुळे, पुढारी वृत्तसेवा : दररोज मासे खाल्ले, तर बाईमाणूस चिकनी दिसू लागते. मग कुणीही बघितले तरी पटवूनच घेणार, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी शिरपूर येथे केले. त्यांनी चित्रपट अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या डोळ्यांचाही संदर्भ दिला आहे. त्यांच्या तोंड फुटले आहे.

आदिवासी या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला मंत्री डॉ. गावित यांचा जावईशोध बाईमाणूस चिकनी दिसू शकते. कुणीही
ते म्हणाले, मासे खाल्ल्याने दोन फायदे होतात. मासे खाल्ल्यावर पाहिले तरी पटवून घ्या. नियमित मासे खाल्ल्याने डोळ्याचे सौंदर्य वाढते. चित्रपट अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे एवढे सुंदर आहेत. तुम्हीही दररोज मासे खाल्ले, तर तुमचे डोळेसुद्धा तिच्यासारखेच सुंदर होऊ शकतात. माशांमध्ये एक प्रकारचे तेल असते. त्यामुळे डोळे आणि त्वचा चांगली राहते. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून महिलावर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

महिला आयोगाने नोटीस

मंत्री गावित यांनी ऐश्वर्या राय यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्य महिला आयोगाने गावित यांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीवर खुलासा करण्याचे निर्देशही महिला आयोगाने दिले आहेत. दुसरीकडे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी गावित यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. मासे खाल्ल्याने डोळे आणि पर्यायाने आरोग्य चांगले राहते. त्यामुळे चांगला जोडीदार मिळतो, असे गावित यांना या वक्तव्यातून सुचवायचे असेल, असे त्यांनी म्हटले आहे.

मासे खाल्ल्याने डोळे सुंदर होत असतील, तर मग माझे डोळेही सुंदर व्हायला हवे होते. मी रोज मासे खातो. मीच काय कोकणातील प्रत्येक माणूस रोज मासे खातो या सर्वांचे डोळेही सुंदर व्हायला हवे होते.

– नितेश राणे, भाजप आमदार

The post मासे खाल्ल्यामुळे बाईमाणूस चिकनी दिसते : विजयकुमार गावित appeared first on पुढारी.