मिरचीला दराचा तडका; गृहिणींचा भडका! मासिक बजेटवर परिणाम

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : गतवर्षाच्या तुलनेत मिरचीचे भाव कमी होतील, अशी गृहिणींना अपेक्षा होती. मात्र उटले झाले असून, लाल मिरचीच्या भावाचा भडका उडाला आहे. आंध्र प्रदेशमध्ये पावसाने मिरची पिकाला झटका दिल्याने उत्पादन घटले आहे. मिरचीने दराचा तडका दिल्याने महिलांचा भडका उडाला आहे. 

मिरचीचे भावसुद्धा गगनाला भिडले.
जीवनावश्‍यक वस्तूंच्या भावात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली. काही वस्तूंचे उत्पादनसुद्धा कमी झाले आहे. त्यामुळे काही वस्तूंचे भाव चांगलेच कडाडले आहेत. मिरची पावडरशिवाय आहाराला रंगतच येत नाही. बाजारात सध्या ३५० रुपयांपासून १५० रुपये किलोपर्यंत मिरची विक्रीस उपलब्ध आहे.
उन्हाळा सुरू होताच मार्च व एप्रिल महिन्यात गृहिणी वर्षभर पुरेल एवढ्या मिरचीची एकावेळीच खरेदी करतात. मिरची वाळवून तिखट तयार करतात. कोरोना विषाणूने पुन्हा थैमान घातले आहे. परिणामी, मालवाहतूक बंद झाली. त्यामुळे जीवनाश्‍यक वस्तूंचे भाव कडाडले. अनेक व्यापाऱ्यांनी साठेबाजी करून नफेखोरी केलीच. मिरचीचे भावसुद्धा गगनाला भिडले.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

लॉकडाउनची टांगती तलवार

लॉकडाउनची टांगती तलवार असल्याने मिरचीच्या दराला अधिकच तिखटपणा आला आहे. सध्या बाजारात सपाटा, काश्मिरी, गंटूर, पटणा ३०० रुपये, भिवापुरी २००, लवंगी १९०, तर गावरान मिरचीचे भाव १६० रुपये प्रतिकिलो आहेत. पाच-दहा किलो मिरची खरेदी करण्यासाठी गृहिणींना विचार करावा लागत आहे. आहारात मिरची पावडरची आवश्‍यकता असते. गृहिणी आपल्या परीने मिरची खरेदी करीत आहेत. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

उत्पादनात घट 
पटणा, भिवापुरीचे दर पाहता गृहिणी गावरान मिरचीची खरेदी अधिक प्रमाणात करीत आहेत. त्यात मिक्स करण्यासाठी एखादी किलो भिवापुरी अथवा पाटणा मिरची खरेदी करीत असल्याचे व्यावसायिक सांगतात. मागील वर्षी पडलेल्या अतिपावसामुळे मिरची पिकाची नासाडी झाली. चंद्रपूर, गडचिरोली, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली जाते. यंदा पावसाळ्यामुळे मिरचीच्या उत्पादनात घट झाली आहे.