मिर्ची चौक : अतिक्रमणावर अखेर हातोडा पुढाऱ्यांच्या अतिक्रमण काढले

मिरची चौक www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिर्ची चौकात झालेल्या अपघातानंतर ‘हॉट ब्लॅक स्पॉट’ बाबत महापालिका प्रशासनाने अतिक्रमण काढण्यासंबंधी दिलेली १५ दिवसांशी मुदत संपुष्टात आल्याने मनपाच्या नगर रचना विभाग व अतिक्रमण विभागाने पोलीस फौज फाट्यासह मिरची हॉटेल व नाशिक वडापाव यांच्या अतिक्रमण जमीनदोस्त केले.

या भागातील पक्के अतिक्रमण काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून अपघातानंतर या भागातील अतिक्रमण धारकांना १५ दिवसांची अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीसा देण्यात येऊन जागेवर रेखांकन करण्यात आले होते. यानंतरही सदर अतिक्रमण धारकांकडून कुठलीही अतिक्रमण काढण्यासंबंधी हालचाल झालेली नव्हती. आज मात्र अतिक्रमण काढण्याची मुदत संपल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सदर अतिक्रमणावर हातोडा चालवण्यात आला व संपूर्ण अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले.

सरसकट कारवाई होणार का? नागरिकांचा सवाल….

चौक परिसरातील सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आले असून यातील ज्या सामान्य नागरिकांनी अतिक्रमण केलेले आहे अशा लोकांनी त्यांचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे मात्र याच चौकातील मुख्य भागात अतिक्रमण केलेल्या पुढार्‍यांनी मात्र अतिक्रमण काढण्याबाबत कुठलीही हालचाल केलेली नाही. यामुळे यांचे अतिक्रमण नक्की निघेल की नेहमीप्रमाणे फक्त सामान्यांवर कारवाई होईल असा प्रश्न नागरिक विचारत आहे.

हेही वाचा:

The post मिर्ची चौक : अतिक्रमणावर अखेर हातोडा पुढाऱ्यांच्या अतिक्रमण काढले appeared first on पुढारी.