मिर्ची चौक : बस दुर्घटनेतील मृतांना उद्या सर्वधर्मीयांकडून श्रद्धांजली

नाशिक बस अपघात ,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिर्ची चौकात बस-आयशरमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व धर्मांच्या धर्मगुरूंकडून शनिवारी (दि.22) सकाळी 11 वाजता दुर्घटनास्थळी विश्वशांती प्रार्थना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास अनिकेतशास्त्री देशपांडे, पंडित गौरवशास्त्री अगस्ते, महानिर्वाणी आखाड्याचे प्रेमपुरी महाराज, विवेक भारती महाराज, जुना आखाड्याचे हर्षद भारती महाराज, काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास पुजारी, पंचमुखी हनुमान मंदिराचे भक्तिचरणदास महाराज, गुरुद्वाराचे जगविंदर सिंग, भदन्त सुगत, भदन्त धम्मरक्षित, भदन्त संघरत्न, इमाम मशीदचे कारी मुझफ्फर हुसेन, किन्नर प्रतिनिधी शिवपार्वती स्वरूप शुभांगी, अंनिसचे ठकसेन गोराणे, अ‍ॅड. भानुदास शौचे तसेच ख्रिश्चन धर्मगुरू आदींसह सर्वधर्मीय धर्मगुरू उपस्थित राहणार असून नागरिकांनीही उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post मिर्ची चौक : बस दुर्घटनेतील मृतांना उद्या सर्वधर्मीयांकडून श्रद्धांजली appeared first on पुढारी.