मिळेल त्या जागी करावे लागतायत अंत्यंसंस्कार! पंचवटी स्मशानभूमीतील विदारक स्थिती

पंचवटी (नाशिक) : कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे मृत्युच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पंचवटी स्मशानभूमीत नऊ बेड 
अस्तिवात आहेत. दुसरीकडे मृत्युच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातील मृतदेहांवर अंत्यसंस्कार याठिकाणीच होत असल्याने प्रशानासनाच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर जमिनीवर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. 

गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत तसेच मृत्युमुखी पडण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील हिंदू धर्मियांच्या दोन प्रमुख स्मशानभूमीत विदारक चित्र आहे. एकीकडे विद्युतदाहिनी बंद पडलेली असतानाच बेड (मृतदेह जाळण्याची जागा) शिल्लक नसल्याने नागरिकांना आपल्या आत्पांवर मिळेल त्या जागी अंत्यंसंस्कार करण्याची वेळ आली आहे. 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

गुन्हे दाखल करण्याचा इशारा 

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाधितांबरोबरच मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पंचवटी स्मशानभूमीच्या तुलनेत नाशिकच्या स्माशनाभूमीत मोठ्या प्रमाणावर बेड आहेत. मात्र याठिकाणी अवघे नऊ बेड असल्याने अंत्यसंस्कार करावे कोठे, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. त्यातच महापालिका आयुक्तांनी जमिनीवर अंत्यसंस्कार केल्यास गुन्हे दाखल करण्याची तंबी दिल्याने स्मशानभूमीत काम करणारेही धास्तावले आहेत. मध्यंतरी पंचवटी स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसविण्यासाठी पे ऑर्डरही निघाल्याची चर्चा होती. परंतु तेही काम थांबल्याचे दिसते. 

गोदावरी ओलांडून शहरात 
हिंदू धर्मसास्त्रात प्रेतावरील अग्नीसंस्काला अर्थात अंतिम संस्काराला खूप महत्व असते. एखादी अंत्ययात्रा निघाली की ती नदी आोलांडून पलिकडे जात नाहीत तर अलिकडच्या काठावरच अग्नीसंस्कारची प्रथा आहे. मात्र करोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे अनेकजण पंचवटीतून गोदावरी ओलांडून थेट शहराच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येत आहेत. 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

पंचवटी स्मशानभूमीत अवघे नऊ बेड असून त्यातील काही तुटलेले आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर मृतदेह येत असल्याने जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मिळावी, जेणेकडून मृतांच्या नातलगांना मनस्ताप होणार नाही. 
- सुनीता पाटील, पंचवटी स्मशानभूमी