मुंगसे बाजारात कांदादरात घसरण; भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता 

मालेगाव (जि.नाशिक) : येथील बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावर गुरुवारी (ता. १०) कांदादरात पाचशे ते सहाशे रुपयांची घरसण झाली. भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त

मुंगसे बाजारात गुरुवारी लाल कांद्याची जवळपास साडेचार हजार क्विंटल आवक होती. भाव कमीत कमी दोन हजार, तर जास्तीत जास्त तीन हजार १५० रुपये होता. सरासरी बाजारभाव दोन हजार ७०० रुपये होता. बुधवारी (ता. ९) लाल कांदा साडेतीन हजार रुपयांपर्यंत विकला गेला. बाजारात उन्हाळ कांद्याची अडीच हजार क्विंटल आवक होती. भाव कमीत कमी एक हजार, जास्तीत जास्त दोन हजार ८००, तर सरासरी दोन हजार २०० रुपये होता. बुधवारी उन्हाळ कांदा तीन हजार ४०० रुपयांपर्यंत विकला गेला.

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO

वातावरणात अचानक बदलाचा परिणाम 

शहर व परिसरात दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होत आहे. बेमोसमी पाऊस झाल्यास शेतात पडून असलेला कांदा भिजून नुकसान होऊ शकते. शिवाय भाव घसरण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांची कांदा विक्रीसाठी लगबग दिसत आहे.

 हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न