मुंबई-आग्रा महामार्गावरील थरारक नाट्य! नाट्य कलाकारावरच गोळीबार   

वाडीव-हे (जि.नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावर रात्री (ता.२५) सव्वा एकच्या सुमारास थरारक नाट्य घडले. एका नाट्य कलाकारावरच गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील थरारक नाट्य!

नाशिक येथील स्वप्नील नंदकिशोर दंडगव्हाळ (वय 34) हे काही कामानिमित्त ठाणे येथे आपल्या मित्राचे वाहन क्र. एम एच 15 इपी 1434 घेऊन गेले होते. ते रात्री नाशिककड़े येत असतांना महामार्गावरिल हॉटेल करिश्मा येथे जेवणासाठी थांबले. जेवण करून पुन्हा वाहनाने रायगड नगर जवळ यूटर्न घेण्यासाठी जात असतांना वालदेवी नदी पुलावर नाशिक बाजूकडून काळ्या रंगाच्या दुचाकी वरुन आलेल्या दोघा इसमांपैकी पाठिमागे बसलेल्या इसमाने पिस्टल मधून चालकाच्या दिशेने गोळीबार केला. मात्र स्टेरिंग समोरिल डैश बोर्डला चाटून गोळीने दिशा बदलली व ती पाठिमागील टपमध्ये जाऊन अडकली. सुदैवाने यात बालंबाल बचावलेल्या दंडगव्हाळ यांनी तत्काळ वाडीव-हे पोलिसांशी संपर्क साधला व घडलेला वृतांत सांगितला. पोलिसांनी नाकाबंदी केली. मात्र हल्लेखोंर पसार होण्यात यशस्वी झाले. त्यांचा शोध सुरु आहे.

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

हल्ला नक्की कोणी व का केला?
स्वप्नील दंडगव्हाळ हे नाट्य कलावंत असून कोरोना काळात नाटक बंद असल्याने जमीन खरेदी विक्रीचा देखील व्यवसाय करत असल्याचे त्यांनी सांगितले, हल्ला नक्की कोणी व का केला? याबाबत पोलिस शोध घेत असून वाडीव-हे येथील दोन पथके आणि गुन्हे शाखेचे एक पथक याबाबत सखोल चौकशी करीत आहेत. या प्रकरणी वाडीव-हे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितिन पाटिल हे करीत आहेत. पोलिस उपाधिक्षक अर्जुन भोंसले यांनी घटनास्थळी भेट देवून पोलिसांना तपास कामी सूचना दिल्या.

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय! 

वाहनचालक थोडक्यात बचावला.

मुंबई-आग्रा महामार्गावर रायगड नगर शिवारात रात्री सव्वा एकच्या सुमारास एका नाट्य कलाकारावर दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात इसमांनी गोळीबार करत पलायन केले सुदैवाने नेम चुकल्याने वाहन चालक थोडक्यात बचावला.