मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात! बसची कारला जोरदार धडक; २५ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

कोकणगाव (जि. नाशिक) : मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणगाव शिवारातील शनी मंदिर परिसरात नाशिककडून  पिंपळगाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारला भीषण अपघातात झाला. अपघातात एका २५ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य ४ जण गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी महामार्ग पोलीस व पिंपळगाव पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत केली.

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणगाव शिवारातील शनी मंदिर परिसरात नाशिकहून पिंपळगावच्या  दिशेने जाणारा एक ट्रक खराब झाल्याने पहिल्या लेनवर उभा होता. दरम्यान पाठीमागून आलेल्या टाटा कंपनीच्या टियगो कार चालकास या ट्रकचा अंदाज आला नाही. दरम्यान  कार भरधाव वेगात असल्यामुळे ट्रकला एका बाजूस घासून कार थेट दुसऱ्या लेनवर येताच पाठीमागून आल्याने चाळीसगाव बसने कारला मागून धडक दिल्याने कार थेट रस्त्याच्या बाजूच्या कुपटीत पलटी झाली. महामार्ग पोलीस पिंपळगाव पोलीस व स्थानिकांच्या मदतीने घटनास्थळी पलटी झालेली कार सरळ केली व जखमींना बाहेर काढत मदत केली.

उर्वरित बातमी थोड्याच वेळात...

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा