मुंबई आग्रा महामार्गावर अपघात; एक जण जागीच ठार

Accident

ओझर; पुढारी वृत्तसेवा : मुंबई आग्रा महामार्गावर एक चारचाकी डिव्हायडरला धडक देत दुसऱ्या मार्गावरील ट्रकवर आदळल्याने मोठा अपघात झाला. याअपघातात एक जण जागीच ठार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास रोहित अंकुश शिवणकर (वय 36, रा. सध्या पिंपळगाव, मुळचा सातारा) हा त्याच्या कारने (एम एच. 15 एफ टी 8453) नाशिककडून पिंपळगांवकडे जात होता. याचदरम्यान हॉटेल सावित्री समोर त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकुन पलटी घेत नाशिक बाजूकडे जाणाऱ्या लेन मध्ये येऊन एका मालट्रकवर आदळली या अपघातात शिवणकर हे जागीच ठार झाले अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे अपघाताचे व्रुत्त समजताच ओझर पोलिसठाण्याचे पीएस आय बोरसे हवालदार रामदास घुमरे पोलिस नाईकस्वप्निल जाधव ,अमोल गांगोडे,प्रसाद सुर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन गँसकटरच्यासाह्याने कारचा पत्रा कट करुन शिवणकर यांचा म्रुतदेह बाहेर काढून शव विच्छेदनासाठी पिंपळगांव येथील रूग्णालयात पाठविला तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. याबाबत ओझर पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे अधिक तपास पोलिस नाईक स्वप्निल जाधव करीत आहेत

The post मुंबई आग्रा महामार्गावर अपघात; एक जण जागीच ठार appeared first on पुढारी.