मुंबई -आग्रा वाडीव-हे महामार्गावर भीषण अपघात; 3 ठार एक जखमी, दोन्ही वाहनांचा चक्काचूर

वाडीव-हे (जि.नाशिक) : मुंबई -आग्रा मार्गावर वाडीव-हे फाट्याजवळील पेट्रोल पंपासमोर आयशर ट्रक व कंटेनर अपघातात 3 ठार 1 जखमी झाले आहे. जखमी अत्यावस्थ आहे. अपघातग्रस्तांना जिल्हा शासकीय रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.

अपघातात 3 इसम ठार
आज (ता.3) सकाळी 6 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 3 वर ट्रक क्रमांक MH15 DK 2355 हा नाशिककडून मुंबईकडे जात असतांना वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजक ओलांडुन नाशिक बाजूकडे जात असताना आयशर क्रमाक MH04 JU 3986 ला समोरून धडक मारल्याने अपघात झाला आहे. या अपघातात 3 इसम ठार झाले आहे. तसेच 1 इसम गंभीर जखमी झाला आहे. मयत तसेच जखमींची नावे अद्याप समजू शकली नाही. 

दोन्ही वाहनांचा चक्काचुर

अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचुर झाला आहे.अपघातानंतर महामार्गावर वाहतुक विस्कळीत झाली होती. ही वाहने क्रेनच्या बाजुला घेऊन नाशिककडे जाणारी मार्गिका बंद करुन एका मार्गाने वाहतुक वळवून वाहतुक सुरळीत करण्यात आली.