“मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसारख्या मोठ्या शहरात लॉकडाऊन लागू शकतो”, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत

<p><strong>मुंबई</strong>&nbsp;: कोरोना रुग्णवाढ न थांबल्यास राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन केला जाऊ शकतो, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळावेच लागतील, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. राज्यात रोज कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.&nbsp;</p>