मुंबई-पुणे प्रवास आजपासून महागला

मुंबई पुणे एसटी प्रवास महागला,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने लागू केलेली १० टक्के दरवाढ बुधवारपासून (दि.८) लागू हाेणार आहे. त्यामुळे दिवाळीत मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह अन्य गावी जाणाऱ्या नाशिककरांच्या खिशाला झळ बसणार आहे.

आनंद व हर्षोल्लासाचा सण असलेल्या दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या दिवाळीच्या सुट्यांमध्ये बाहेरगावी जाण्याचा बेत नाशिककरांनी आखला आहे. परंतु, बाहेरगावी जाणाच्या प्लॉन आखणाऱ्या नाशिककरांना एसटी महामंडळाच्या हंगामी दरवाढीमुळे नियमित दरांपैक्षा तिकीटासाठी अतिरिक्त १० टक्के जादाचे पैसे मोजावे लागणार आहे.

एसटी महामंडळाची दिवाळीत हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरची दरवाढ ८ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत लागू असणार आहे. महामंडळाच्या साधी, जलद, निमआराम, शिवाई, शिवशाही तसेच शिवनेरी अशा सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी ही दरवाढ लागू असेल. हंगामी भाडेनुसार मुंबई-पुण्यासाठी जादाचे ४५ ते पन्नास रुपये माेजावे लागतील. धूळ्यासाठी २५ रुपये तिकीटासाठी द्यावे लागणार आहेत. प्रवाशी भाड्यात आरक्षण शुल्काचा व सरचार्ज शुल्काचा समावेश नाही. तसेच नाशिक ते पुणेदरम्यान, शिवशाही, जनशिवनेरी व शिवाई सेवा, नाशिक-धुळे या विनावाहन सेवेकरिता ठोक भाडे (फ्लॅट रेट) आकरण्यात येतील, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाचे नियंत्रक अरूण सिया यांनी दिली आहे.

हेही वाचा :

The post मुंबई-पुणे प्रवास आजपासून महागला appeared first on पुढारी.