Site icon

मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. डॉ. सोनवणे यांची नियुक्ती

नाशिक / पुणे; पुढारी वृत्तसेवा : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदी प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांची नियुक्ती शुक्रवारी (दि.19) राज्यपाल रमेश बैस यांनी केली. प्रा. डॉ. सोनवणे हे सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू म्हणून कार्यरत होते. डॉ. सोनवणे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विविद्यापीठाचे नववे कुलगुरू ठरले आहेत. (YCMOU Vice-Chancellor)

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई वायुनंदन यांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपला. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. राज्यभरातील इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्यपाल कार्यालयाकडून डॉ. सोनवणे यांची कुलगुरू पदी निवड करण्यात आली.(YCMOU Vice-Chancellor)

डॉ. सोनवणे यांनी आतापर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख, मुक्त अध्ययन प्रशाळेचे प्रमुख आदी जबाबदाऱ्या निभावल्या आहेत. सध्या ते प्र कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. वयाची ६५ वर्षे किंवा पाच वर्षे यातील जे आधी होईल त्या कालावधीसाठी डॉ. सोनवणे यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड करण्यात आली. (YCMOU Vice-Chancellor)

कुलगुरू पदी झालेल्या निवडीबाबत आनंद व्यक्त करून डॉ. सोनवणे म्हणाले, की तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोहोचवण्याची संधी प्राप्त झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणे, अभ्यासक्रम रोजगारक्षम करणे अशा काही उद्दिष्ट्यांवर काम करण्यास प्राधान्य देणार आहे.

अधिक वाचा :

The post मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. डॉ. सोनवणे यांची नियुक्ती appeared first on पुढारी.

Exit mobile version