Site icon

मुख्यमंत्री आज नाशिक दौर्‍यावर

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (दि. 21) नाशिक दौर्‍यावर येत असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विभागीय आयुक्तालय परिसरातील सारथी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन सकाळी 10.30 वाजता करण्यात येणार आहे.

त्यानंतर पळसे येथील नासाकाच्या गळीत हंगामाचा प्रारंभ ना. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. जीपीओसमोर दुपारी 12 वाजता बाळासाहेबांची शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री करतील. तसेच कालिदास कलामंदिर येथे दुपारी 1 वाजता पुरस्कार वितरण सोहळ्याला ते हजेरी लावतील. दौर्‍यात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासनाने विशेष तयारी केली आहे.

The post मुख्यमंत्री आज नाशिक दौर्‍यावर appeared first on पुढारी.

Exit mobile version