Site icon

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : महाराष्ट्रात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय होणार; साक्रीत दिव्यांगांचा जल्लोष

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
आमदार बच्चू कडू यांच्या मार्फत सातत्याने केलेल्या पाठपुरावामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय मा. राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू व प्रहार दिव्यांग समितीची बैठक बोलावून एैतिहासिक व नाविन्यपूर्ण घोषणा मुंबई येथे केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यासाठी रविवारी, दि.13 शासकीय विश्रामगृह, साक्री येथे दिव्यांगांनी फटाक्यांची आतिषबाजी ढोलताशे व पेढे वाटप केले. तसेच तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पूर्वनियोजित बैठक पार पडली. त्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका विभागप्रमुख जयेश बावा यांनी सूत्रसंचालन केले. दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष हेमंत सोनवणे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख पदाधिकारी उपाध्यक्ष संजय पाटील राजधानी, शहर अध्यक्ष मुन्ना अहिरराव, काटवाण प्रमुख राजू भदाणे, भूषण गांगुर्डे, विजय बागुल, माळमाथा अध्यक्ष गोकुळ बेडसे, बबलू चौरे, अमृत भवरे, कविता सोनवणे व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा:

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : महाराष्ट्रात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय होणार; साक्रीत दिव्यांगांचा जल्लोष appeared first on पुढारी.

Exit mobile version