मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला येणार, प्रशासनाची जोरदार तयारी

एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी (दि.30) नाशिकच्या दौर्‍यावर येत आहेत. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे नाशिकमध्ये येत असल्याने प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. दौर्‍याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी मंगळवारी (दि.26) सकाळी 10 ला विविध विभागांची बैठक बोलविली आहे.

गेल्या महिन्यातील राजकीय नाट्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले. त्यानंतर शिंदे यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांचे दौरे सुरू केले आहेत. त्या अंतर्गत येत्या शनिवारी शिंदे नाशिकच्या दौर्‍यावर येणार आहेत. यावेळी नाशिक व मालेगावमध्ये ते भेट देणार असल्याचे कळते आहे. त्यामुळे शिंदे समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री समृद्धीसह जिल्ह्यातील विविध प्रकल्पांबाबतची माहिती जाणून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनानेदेखील मुख्यमंर्त्यांच्या दौर्‍याची तयारी सुरू केली आहे. शिंदे यांच्या स्वागतासह सुरक्षा तसेच संपूर्ण दौर्‍यात कोणतीही उणीव भासू नये, यासाठी प्रशासन सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी मंगळवारी (दि.26) बैठक बोलविली आहे. त्यामध्ये महसूलसह पोलिस व संबंधित अधिकार्‍यांच्या अधिकार्‍यांना पाचारण केले आहे.

हेही वाचा :

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला येणार, प्रशासनाची जोरदार तयारी appeared first on पुढारी.