मुख्यमंत्र्यांनी भविष्य बघितल्याची माहिती धादांत खोटी : दादा भुसे

Dada Bhuse

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे ईशान्येश्वराचे दर्शन घेतले. दर्शन घेणे काही गैर नाही. त्याठिकाणी त्यांनी ज्योतिषाकडून भविष्य बघितले, ही माहिती धादांत खोटी आहे. याबाबत उगाचच कोणी वावड्या उठवू नये, असे सांगत त्यांनी दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेबाबत स्पष्टीकरण दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी (दि. २३) शिर्डी दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी भविष्य जाणून घेतले यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहेत. याबाबत ना. दादा भुसे यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी येथे साई मंदिरात सपत्नीक पाद्यपूजा केली. ते शिर्डीहून सिन्नर तालुक्यातील श्री ईशान्येश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेथेही पूजा केली. या भेटीनंतर माध्यमातून उलटसुलट माहिती येत असल्याने वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री पूजेला गेले होते. हात दाखविण्याचा प्रकार झालेला नसल्याचे ना. भुसे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

The post मुख्यमंत्र्यांनी भविष्य बघितल्याची माहिती धादांत खोटी : दादा भुसे appeared first on पुढारी.