मुद्रांकांचे गैरव्यवहार तपासणीसाठी जिल्हाभरात १२ तपासणी पथके 

नाशिक : जिल्ह्यातील मुद्रांकांचा गैरव्यवहार झाल्याचे सकृतदर्शनी उघडकीस आल्याने जिल्ह्यात सगळीकडेच मुद्रांक गैरव्यवहार तपासणीसाठी १२ तपासणी पथके नेमण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही महिती दिली.

देवळा येथे मुद्रांक गैरव्यवहार प्रकरण उजेडात आले आहे. जिल्हा महसूल यंत्रणेने साधारण आतापर्यंत २४१ दस्त तपासले असता, त्यात तथ्य आढळून आले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील ४० हजार मुद्रांक दस्तांची तपासणी केली जाणार आहे. यात काही स्टॅम्प बनावट असल्याचे आढळल्याने त्यानुसार जिल्हाभरात ही पथक मुद्रांकांची तसेच दस्तांची तपासणी करणार आहे. 

हेही वाचा  - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा