मुलीची छेड काढण्यावरून झालेल्या मारहाणीत युवक ठार

धुळे

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना साक्री तालुक्यातील निजामपूर गावात घडली आहे. या मारहाणीत आणखी एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण तयार झाले आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, निजामपूर गावात राहणाऱ्या एका युवतीची छेड काढण्याचा प्रकार आज घडला. ही माहिती संबंधित युवतीच्या नातेवाईकांना कळाल्याने त्यांनी छेड काढणाऱ्याला याचा जाब विचारला. मात्र यावेळी वादाचे पर्यावरण हाणामारीत झाल्यामुळे या हाणामारीमध्ये एक जण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवत असताना त्याची प्राणज्योत मालवल्याची घटना घडली. दरम्यान या हाणामारीत आणखी एक जण जखमी झाला असून त्याला नंदुरबार येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाभरातील पोलीस बंदोबस्त निजामपूरला रवाना करण्यात आला आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले, असून परिस्थिती नियंत्रणात आहे. यासंदर्भात कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

 हेही वाचा

The post मुलीची छेड काढण्यावरून झालेल्या मारहाणीत युवक ठार appeared first on पुढारी.