मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांवर कठोर कारवाई; कृषिमंत्री दादा भुसेंचा इशारा

नाशिक : कोरोनाच्या महामारीत स्वार्थापलीकडे जाऊन काम करण्‍याची गरज आहे. अशा काळात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न दिसेल त्याविरोधात कठोर कारवाया होतील, असा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला. 

भुसे यांनी सोमवारी (ता. १२) जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत आढावा बैठक घेतली. त्या वेळी पंचवटीत बाराशे रुपयांचे रेमडेसिव्हिर २५ हजाराला विक्रीच्या प्रकरणात एका डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे वैद्यकीय 
क्षेत्रातील लुटमारीच्या राज्यातील घटनेबाबत ते पत्रकारांशी बोलत होते. 

भुसे म्हणाले, की कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सामान्य नागरिक हतबल आहे. अशा काळात स्वार्थापलीकडे जाऊन काम करण्याची गरज आहे. मात्र माणुसकीने वागण्यऐवजी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जर कुणी मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाया कराव्याच लागतील. माणुसकीला काळिमा फासणारे असे कृत्य आहे. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ