मृत्यू चाटून जातो तेव्हा! विल्होळी नाका भीषण अपघातात तिघांनी अनुभवला थरार

 सिडको (नाशिक) : ‘देव तारी त्याला कोण मारी’, या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव बुधवारी (ता. ३) विल्होळी नाका येथे आला. पहाटे साडेपाचच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, प्रथमदर्शनी गाडीत काही जीवितहानी झाली तर नाही ना, असा संशय येथील नागरिकांना आला. पुढे....

ट्रक-कार अपघातात बालबाल बचावले 

मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या (एमएच-१५-एफटी-२५६०) या चारचाकीने जुन्या जकात नाकासमोरून वळणावर वळलेल्या ट्रकला (एमएच-१५-एजी-१५८२) जोरदार धडक दिली. या वेळी झालेल्या अपघातात कमलाकर साळुंके, सुनील सूर्यवंशी, प्रशांत पाटील हे तिघे जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळपर्यंत याबाबत अंबड पोलिस ठाण्यात कुठलीही फिर्याद दाखल नव्हती. मात्र, सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच